IS Attack Saam TV
देश विदेश

आत्मघाती हल्लेखोराला रशियात अटक, सत्ताधारी भाजपचा बडा नेता होता टार्गेटवर

हल्लेखोराला आयएसच्या एका नेत्याने तुर्कीमध्ये आत्मघाती हल्लेखोर म्हणून भरती केले होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या एका इस्लामिक स्टेट (Is) दहशतवादी गटाच्या आत्मघाती हल्लेखोराला रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB)च्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतलं आहे.

या दहशतवाद्याला रशियामधून (Russia) भारतात येत असताना ताब्यात घेतलं आहे. या हल्लेखोरचा भारतात सत्तेत असणाऱ्या भाजपच्या (BJP) एका बड्या नेत्यावर हल्ला करण्याचा प्लॅन होता अशी माहिती समोर आली असून याबाबतचे वृत्त रशियाची वृत्तसंस्था स्पुटनिकने दिलं आहे.

पाहा व्हिडीओ -

रशियाच्या FSB ने रशियामध्ये बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा सदस्य ओळखला आणि त्याला ताब्यात घेतलं . ताब्यात घेतलेला अतिरेकी हा मध्य आशियामधील एका देशाचा मूळ रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादाययक बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराने सध्या भारतामध्ये सत्तेत असणाऱ्यां भाजपच्या एका बड्या नेत्याविरोधात कारवाईचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या हल्लेखोराला आयएसच्या एका नेत्याने तुर्कीमध्ये आत्मघाती हल्लेखोर म्हणून भरती केले होतं अशी माहिती FSB च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT