पहा व्हिडीओ : लहान मुलीला तब्बल 16 वेळा चावला पाळीव कुत्रा; घटना CCTV मध्ये कैद Saam TV
देश विदेश

पहा व्हिडीओ : लहान मुलीला तब्बल 16 वेळा चावला पाळीव कुत्रा; घटना CCTV मध्ये कैद

काही दिवसांपुर्वी एका मुलीला मोकाट कुत्र्यांनी घेरुन जखमी केल्याची धक्कादायक घटनेचा Video व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका पाळीव कुत्र्याने लहान मुलीला जखमी केल्याची एक घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : घरातील पाळीव कुत्रा बाहेर फिरायला घेऊन गेले असता तोच कुत्रा एका 9 वर्षांच्या मुलीला तब्बल16 वेळा चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्र्याने हल्ला (Dogs Attack) केल्याने ही चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती नाजूक आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे. याप्रकरणामध्ये त्या कुत्र्याच्या मालकाला पोलिसांनी दोषी ठरवत ताब्यात घेतले आहे.

नुकतंच काही दिवसांपुर्वी एका मुलीला मोकाट कुत्र्यांनी घेरुन जखमी केल्याची धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता चेन्नईमध्ये (Chennai) ही कुत्र्याने जखमी केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. एका स्थानिक वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एक 9 वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना त्याचवेळी एक माणूस आपल्या पाळीव कुत्र्याला (Dog) घेऊन बाहेर फिरायला आला होता. त्यावेळी तो कुत्रा मालकीणीच्या हातातून निसटला आणि त्याने 9 वर्षांच्या मुलीवरती हल्ला केला.

सदर घटना 28 डिसेंबरला घडली असून या घटनेचा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. कुत्रा आधी मुलीच्या मागे लागला ते या मुलीला कळताच ती धावू लागली मात्र कुत्र्यांने तिला गाठले आणि तिचा चावा घ्यायला सुरुवात केली आणि या कुत्र्याने एक दोन वेळा नव्हे तर तब्बल 16 वेळा कुत्र्याने मुलीचा चावा घेतला ही घटना पाहताच तेथील उपस्थित लोकांनी कुत्र्याला हुसकावून लावलं मात्र तोपर्यंत ती मुलगी गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी चेन्नईतील नोलंबूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी कुत्र्याच्या मालकीणीला ताब्यात घेतलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2026: छोटा पॅकेट, बडा धमाका! वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सनं केलं कॅप्टन

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

पुणे-बेंगळुरू माaर्गावर बसवर दरोडा, बसमधील दरोड्याचा कट कुठे शिजला? हादरवणाारी माहिती समोर

Maharashtra Live News Update: निष्ठावंताना न्याय द्या, पुण्यात शिवसैनिक आक्रमक

Tragic Incident: शेकोटीनं घेतला जीव; हॉटेलच्या रुममध्ये ५ जणांचा गुदमरुन मृत्यू

SCROLL FOR NEXT