Uttarpradesh News Saam TV
देश विदेश

Uttar Pradesh News : उंदराला मारल्याने उत्तरप्रदेशात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल; उंदराचं पोस्टमार्टम करण्याचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बायंदू जिल्ह्यात रविवारी २५ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh News : आजवर आयुष्यात तुम्ही एकदा तरी उंदीर मारला किंवा पिंजरा लावून पकडला असेल. अनेक व्यक्ती घरात उंदीर झाले की उंदीर मारण्याचे औषध घरात टाकतात. उंदीर मारल्याने तुमच्यावर कधी गुन्हा दाखल झाला आहे का? उंदीर मारल्यामुळे कोणतीही शिक्षा होत नाही. मात्र उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) मनोज कुमार याने उंदीर मारल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बायंदू जिल्ह्यात रविवारी २५ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. विकेंद्र शर्मा या व्यक्तीने मनोज विरोधात कोतवाल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उंदराला खूप क्रूरतेने मारले आणि हे सर्व त्याने त्याच्या मुलांना देखील दाखवले. प्रत्येक माणसाने मुक्या प्राण्यांचा जीव जाणला पाहीजे त्यामुळे ही तक्रार दाखल केल्याचे विक्रेंद्र म्हणाला.

अशी केली उंदराची हत्या

विकेंद्रने सांगितल्यानुसार, मनोजने उंदराच्या शेपटीला एक दगड (Stone) बांधला होता. तो उंदराला नाल्यात बुडवून बुडवून मारत होता. त्याला पाहून विकेंद्रने त्याला असे न करण्यास सांगितले. त्यावर मनोजने रागात येऊन उंदीर नाल्यात फेकून दिला. त्यामुळे विकेंद्र उंदराचा जीव वाचवण्यासाठी नाल्यात उतरला. त्याने उंदराला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. यावर विकेंद्रने मनोजला असे परत न करण्यास बजावले पण तो काही ऐकून न घेता विकेंद्रवर ओरडू लागला. त्यामुळे विकेंद्रने त्याच्याविरोधात तक्राक दाखल केली.

विक्रेंद्रने उंदराच्या शवविच्छेदनाची मागणी केली होती. त्यांमुळे पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहीत याची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी उंदराचे शवविच्छेदन IVRI मध्येच केले जाऊ शकते असे सांगितले. मृत उंदराला IVRI मध्ये दाखल करण्यात आले आहे. याचा अहवाल येण्यास काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल असे सांगण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी कलम ४२९९ (प्राण्यांना मारणे किंवा अपंग करणे) अंतर्गत मनोजवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT