फुकटचा प्रवास जीवावरती बेतला; टर्नस्टाईलमध्ये अडकून युवकाचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद 
देश विदेश

फुकटचा प्रवास जीवावरती बेतला; टर्नस्टाईलमध्ये अडकून युवकाचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

उडी मारल्यानंतर खाली पडताना स्वत:ला सावरण्याच्या नादात त्याच्या हातातून मोबाईलही (Mobile) पडला आणि तो पकडण्याच्या नादात त्याचा तोल गेला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फुकटचा रेल्वे प्रवास (Train Travel) करणं एका प्रवाशाच्या जीवावरती बेतलं आहे. रेल्वेस्थानकावर असणाऱ्या टर्नस्टाईलमध्ये अडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अमेरिकेतील (America) न्यूयॉर्क शहरामध्ये रविवारी पहाट्याच्या सुमारास ही घटना घडली आहे दरम्यान हत्येचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ख्रिस्तोफर डी ला क्रूझ हा 28 वर्षीय तरुण न्यूयॉर्क येथील फॉरेस्ट हिल्स 71 अव्हेन्यू रेल्वे स्थानकावरती आल्यानंतर तिकीट न काढता काही पैसे वाचवण्याच्या नादात तो भुयारी रेल्वे स्थानकावरील टर्नस्टाईलवरून उडी मारण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडल्याने क्रूझ याचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा -

उडी मारल्यानंतर खाली पडताना स्वत:ला सावरण्याच्या नादात त्याच्या हातातून मोबाईलही (Mobile) पडला आणि तो पकडण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि टर्नस्टाईलमध्ये त्याचे डोके अडकल्याने त्याची मान मोडली आणि यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील CCTV मध्ये कैद झाला आहे. घटनेतील मृत तरुण हा तिकीट टाळण्याच्या उद्देशानेच टर्नस्टाईलवरुन उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: उत्साहाने दिवसाची सुरुवात होणार; 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mangalsutra Trendy Design: साडीपासून ते जिन्स टॉपवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स, मिळेल ग्लॅमरस लूक

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत एका सोसायटीमध्ये लिफ्टचा अपघात

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

SCROLL FOR NEXT