Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: अरेरे, हिरोगिरी पडली महागात! वर्गासमोरचं केला प्रपोज; मुलीने घडवली चांगलीच अद्दल, पाहा Viral Video

या प्रपोजमुळे ती मुलगी चांगलीच संतापते, ज्यानंतर तिने मुलाच्या केलेल्या फट फजितीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Valentine Day: फेब्रूवारी महिना आला की व्हॅलेंटाईन डे ची चाहूल लागते. प्रत्येकजण आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आतुर असतो. अनेकांना ज्यामध्ये यश मिळते, तर बऱ्याचदा प्रपोज करणे महागातही पडू शकते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये मुलाने वर्गातच मुलीला प्रपोज केल्याचे दिसत आहे. मात्र त्याच्या या प्रपोजमुळे ती मुलगी चांगलीच संतापते, ज्यानंतर तिने मुलाच्या केलेल्या फजितीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

सध्या देशभरात व्हॅलेंटाईन डे चा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी आतुर झाला आहे. १४ फेब्रूवारीला सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. आता या लव्हबर्ड्सची प्रतिक्षा जवळपास संपली आहे. कारण उद्याच व्हॅलेंटाईन डे असल्याने प्रेमीयुगुलांची प्रेम व्यक्त करण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मात्र त्याआधीच एका मुलाने वर्गामध्येच प्रपोज करणाऱ्या मुलाला चांगलीच अद्दल घडवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणाने व्हॅलेंटाईन डे आधीच एका मुलीला वर्गातच लाल गुलाब घेऊन प्रपोज केला. पण त्या मुलीने तरुणाला आयुष्यभरासाठी चांगलीच अद्दल घडवली. हा संपूर्ण प्रकार वर्गातील विद्यार्थ्यांनी कॅमेरात कैद केला असून व्हिडी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी हातात गुलाबाचं फुल घेऊन मुलीच्या बाजूला उभा असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तो मुलगा प्रपोज करण्याच्या इराद्यात असताना शेजारी असलेले विद्यार्थी त्याचा व्हिडीओ काढत असतात. मुलगी समोर दिसताच तो तरुण हातात असलेला गुलाब पाठीमागे लपवण्याचा प्रयत्न करतो. पण संतापलेल्या मुलीनं गुलाबाचा फुल हातात घेऊन तोडल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

मुलीने प्रेमाला नकार देताच नाराज झालेला मुलगा गुलाबाचं फुल तिच्या अंगावर फेकून देतो. त्यानंतर तरुणीचा पारा आणखी वाढतो आणि हातात असलेली बॅग थेट त्या मुलाच्या तोंडावर फेकते. पण तो मुलगा बॅगेच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करताना व्हिडीओत दिसत आहे.

घर के कलश नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्याने १ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत मुलीचे कौतुक केले आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamanna Bhatia:'आज की रात' फेम तमन्ना भाटियाचा नवा लूक, फोटो तुफान व्हायरल

Shahapur : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; पाणी पुरवठा करणारे तीनही धरण ओव्हरफ्लो

Mumbai To Bhimashankar: मुंबईहून भीमाशंकरला कसे जायचे? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाचे सोपे पर्याय

Laughter Chefs 2 Winner: रिम- अली नाही तर या स्पर्धकांनी जिंकली लाफ्टरशेफची ट्रॉफी मिळाली इतक्या रुपयांचे बक्षिस

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात महायुतीत तणावाचे संकेत, जिल्हाध्यक्षांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT