Building Collapses in Kolkata Saam TV
देश विदेश

Building Collapses: मोठी दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली ५ मजली इमारत झोपड्यांवर कोसळली; थरारक घटनेचा VIDEO समोर

Kolkata Building Collapses: बांधकाम सुरू असलेली ५ मजली इमारत अचानक झोपड्यांवर कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Satish Daud

Building Collapses in Kolkata

पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे रविवारी (ता. १७) मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेली ५ मजली इमारत अचानक झोपड्यांवर कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या भयानक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एनएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोलकात्यातील मेटियाब्रुझ येथे एका ५ मजली इमारतीचे काम सुरू आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांधकाम सुरू असलेली इमारत अचानक परिसरातील झोपड्यांवर कोसळली. (Latest Marathi News)

या दुर्घटनेत अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. इमारत कोसळताच परिसरात मोठी आरडाओरड सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १० मजुरांना बाहेर काढण्यात आले.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, यातील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अजूनही काही मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. सध्या बचावपथक त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून कोसळलेल्या इमारतीत बांधकाम सुरू होते.

घटनेच्या वेळी इमारत रिकामी होती. मात्र, ज्या झोपड्यांवर ही इमारत कोसळली. त्यात अनेक लोक झोपले होते. दुसरीकडे कोलकाता महापालिका आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय हे बांधकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT