धक्कादायक : उपचारासाठी गेलेल्या 12 वर्षांच्या मुलीवरती डॉक्टरनेच केला लैंगिक अत्याचार SaamTV
देश विदेश

धक्कादायक : उपचारासाठी गेलेल्या 12 वर्षांच्या मुलीवरती डॉक्टरनेच केला लैंगिक अत्याचार

पीडित अल्पवयीन मुलगी दवाखान्यामध्ये (Hospital) गेली असता नराधम डॉक्टरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : नवी दिल्ली (New Delhi)मधील एका मोहल्ला क्लिनिकमध्ये 12 वर्षांच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी क्लिनिकमधील डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी पीडित अल्पवयीन मुलगी सदरच्या दवाखान्यामध्ये गेली असता नराधम डॉक्टरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हे देखील पहा -

दरम्यान पीडित मुलीने घरी आल्यानंतर डॉक्टरने केलेल्या दुष्कृत्यांची माहिती कुटुंबातील सदस्यांना सांगितली. सदरची घटना ही पीडित मुलगी राहात असलेल्या परिसरातच घडली आहे. सदर घटनेतील मुलीचे वडिल हे वेंडर म्हणून काम करतात. प्रकृती बरी नसल्याने बुधवारी पीडित मुलगी मोहल्ला क्लिनिकमध्ये गेली असता तिच्यावरती हा अत्याचार झाल्याची माहिती पीडित मुलीच्या घरच्या सदस्यांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टरला अटक केली असून त्या डॉक्टवरती पोक्सो कायद्यांतर्गत (Pocso Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीवरती उपचार व समुपदेशन करणे सुरु आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

Maharashtra Live News Update: दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाक्यावर काॅग्रेसची धडक

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT