Jaipur Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking News : चौथीतील विद्यार्थिनीची आत्महत्या, शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?

Jaipur Crime News : जयपूरमधील एका प्रसिद्ध शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शाळेतील कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

जयपूरच्या शाळेत चौथीत शिकणाऱ्या मुलीची चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

अमायराचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद

पालकांचा शाळेवर निष्काळजीपणाचा आरोप

पोलिस तपास सुरू

जयपूरमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध खाजगी शाळेतील चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. धक्कदायक म्हणजे या विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र ही आत्महत्या होती की घातपात याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेने शाळाप्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव अमायरा असून ती नेहमीप्रमाणे शनिवारी शाळेत गेली. अमायरा इयत्ता ४थीत शिकत होती. तिचा शिकवणीचा वर्ग तळमजल्यावर होता. दुपारी १२ नंतर अमायरा बाथरूमला गेली. त्यानंतर ती शाळेच्या चौथ्या मजल्यावर गेली. चौथ्या मजल्याच्या एका रेलिंगला उभी राहून अमायराने खाली वाकून बघितलं. नंतर आजूबाजूला पाहायला आणि रेलिंगवर चढून खाली उडी मारली.

या दुर्घटनेत अमायराचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना शाळेतील कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. अमयाराच्या आत्महत्येनंतर शाळेतील शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केली. मृत मुलीच्या पालकांनी शाळेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मृत मुलीच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, अमायराच्या मृत्यूला शाळा जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटलं. शिवाय या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मात्र शाळा प्रशासन तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान या मुलीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेहबूबा-मेहबूबा गाण्यावर बेली डान्सर थिरकत होती, अचानक आगीच्या ठिणग्या अन् लोकांची धावाधाव; गोव्यातील दुर्घटनेचा VIDEO

Bone cancer: लहान मुलांमधील हाडांच्या कॅन्सरचं निदान का होतं उशीरा? काय आहेत याची लक्षणं वाचा

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Bigg Boss 19 Winner : 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' स्पर्धक आघाडीवर

PM किसान योजनेतून धाराशिवचे २५८८ शेतकरी वगळले, कारण आले समोर

SCROLL FOR NEXT