Ukraine News Twitter
देश विदेश

सारे काही मातृभूमीसाठी! ऐंशी वर्षांचा वृद्धही सैन्य भरतीच्या रांगेत

युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे.

वृत्तसंस्था

युक्रेन आणि रशिया (Russia) यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान, सोशल मीडियावर युक्रेनच्या (Ukraine) नागरिकांच्या हृदयद्रावक फोटोंची चर्चा आहे. युक्रेनमधील सबवे स्टेशनवर निरोप घेत असलेल्या जोडप्याच्या व्हायरल फोटोपासून, वडील आणि मुलगी एकमेकांना मिठी देत रडत असल्याचे फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून नेटिझन्सला धक्का बसला आहे.

हे देखील पहा -

यानंतर आता युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. कॅटेरीना युश्चेन्को यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये एका वृद्ध व्यक्ती बॅग घेऊन उभा असलेला, सैन्यात भरती होण्यासाठी तयार असल्याचे दिसून येत आहे. या वृद्ध व्यक्तीच्या पिशवीतील समान पाहून नक्कीच तुमच्या डोळ्यात देखील अश्रू येईल.

"कोणीतरी या 80 वर्षीय वृद्धाचा फोटो पोस्ट केला आहे जो सैन्यात भरती होण्यासाठी उभा असल्याचे दिसत आहे, त्याच्यासोबत 2 टी-शर्ट, एक पॅंट, एक टूथब्रश आणि दुपारच्या जेवणासाठी काही सँडविच असल्याचे दिसून येत आहे. तो म्हणाला हे सर्व तो त्याच्या नातवंडांसाठी करत होते," असे कॅप्शन देखील या पोस्टला कॅटेरीना युश्चेन्कोने दिले आहे. या पोस्टला 133k पेक्षा जास्त लाईक्स आणि अनेक लोकांनी या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT