Balloon  Saam TV
देश विदेश

Uttar Pradesh News : हृदयद्रावक! फुग्याने घेतला चिमुकलीचा जीव; फुगा फुटल्याने ६ वर्षीय मुलीचा गुदमरून मृत्यू

Girl Death Due to Balloon : वडील देवदत्त यांच्या म्हणण्यानुसार, फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने श्वास घेण्यास मुलीला त्रास होत होता. त्यामुळे गुदमरल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रविण वाकचौरे

Uttar Pradesh News :

फुग्याने लहानग्या मुलीचा जीव घेतल्याची घटना उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातून समोर आली आहे. मौरवान पोलीस स्टेशन हद्दीतील मोतीखेडा गावात तोंडाने फुगा फुंकणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीचा फुगा फुगवताना मुत्यू झाला आहे. फुगा फुटल्याने तोंडात फुग्याचा अडकलेला भाग घशात गेल्याने श्वसन नलिका चोकअप झाल्या मुलीचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

मोतीखेडा येथील रहिवासी देवदत्त यांची ६ वर्षांची मुलगी अभिलाषा हिचे काका मोहितकुमार यांच्या घरी मंगळवारी हळदीचा कार्यक्रम होता. अभिलाषाही तिची आई रोनमसोबत गेली होती. तिथे तिने फुग्यांसोबत खेळायला सुरुवात केली. फुगा फुगवताना फुटला आणि काही भाग मुलीच्या तोंडात राहिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फुगा गिळण्याचा प्रयत्न करत असताना तो तिच्या घशात अडकला. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांना न कळवता कुटुंबीयांनी बुधवारी मुलीवर अंत्यसंस्कार केले.

वडील देवदत्त यांच्या म्हणण्यानुसार, फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने श्वास घेण्यास मुलीला त्रास होत होता. त्यामुळे गुदमरल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

Madhuri Dixit Birthday: माधुरीला अभिनय नाही 'या' क्षेत्रात करिअर करायचं होतं; अशी बनली बॉलिवूडची 'धक-धक गर्ल'

SCROLL FOR NEXT