Bihar Accident News  Saam tv
देश विदेश

Bihar Accident News : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळीवर काळाचा घाला; भरधाव ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

bihar bhagalpur road accident : लग्नाला जाण्यासाठी निघालेल्या कारवर भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी झाले आहेत.

Vishal Gangurde

बिहार : बिहारच्या भागलपूरमधून रोड अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भागलपूरच्या घोघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमापूर गावाजवळ ही अपघाताची घटना घडली. लग्नाला जाण्यासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळीच्या कारवर भरधाव ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी झाले आहेत.

वाळू घेऊन जाणारा ट्रक हा वऱ्हाडी मंडळीच्या कारवर उलटला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. यानंतर त्यांनी या अपघातामधील जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघातात तीन लोक जखमी झाले आहेत. या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

छत्तीसगडमध्ये भीषण अपघात

दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्येही भीषण अपघाताची घटना घडली. टेम्पो आणि पिकअपच्या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २३ जण गंभीर जखमी झाले. छत्तीसगडच्या बेमेटारा परिसरात ही घटना घडली. या मृतांमध्ये ५ महिला, ३ मुले आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

वाराणसीमधील भीषण अपघातात एकाचा मृत्यू

वाराणसीत २७ एप्रिलला ई-रिक्षा चालक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात भरधाव वेगात असणाऱ्या दुचाकीस्वाचाराचा मृत्यू झाला. ही अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आकाश सिंह असे दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

या अपघातानंतर आकाशला रुग्णालायत दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच आकाशने श्वास सोडला. या भीषण अपघातानंतर ई-रिक्षा चालक फरार झाला. या अपघात प्रकरणी आकाशच्या वडिलांनी कीडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हा ई-रिक्षाचालक अद्याप फरार आहे. त्याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Beauty Tips : ग्लोइंग त्वचा आणि लांब सडक केस पाहिजेत? मग काय खावं समजून घ्या

Maharashtra Live News Update: - कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव नतंर अमरावतीत सुद्धा 15 ऑगस्टला मटन चिकनची विक्री बंद

Supreme Court: आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही: सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT