देशामध्ये 4G च्या तुलनेत 5G चा अधिक वेग... ओक्लाचा दावा Saam Tv
देश विदेश

देशामध्ये 4G च्या तुलनेत 5G चा अधिक वेग... ओक्लाचा दावा

ग्लोबल इंटरनेट टेस्टिंग ओक्लाच्या अहवालानुसार, भारतात 5G लाँच केल्याने, सध्या 4G- LTE नेटवर्कद्वारे ऑफर केले जाणाऱ्या, डाउनलोड स्पीडच्या तुलनेमध्ये सरासरी डाउनलोड स्पीड १० पट वाढण्याची क्षमता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ग्लोबल इंटरनेट : Global Internet टेस्टिंग ओक्लाच्या Ookla अहवालानुसार, भारतात 5G लाँच Launch केल्याने, सध्या 4G- LTE नेटवर्कद्वारे ऑफर केले जाणाऱ्या, डाउनलोड स्पीडच्या Download speed तुलनेमध्ये सरासरी डाउनलोड स्पीड १० पट वाढण्याची क्षमता आहे. अचूक स्पेक्ट्रम Spectrum वाटप आणि रोलआउट Rollout योजनेबाबत अनिश्चितता याचाच विचार केले असता. भारतीय Indian वापरकर्त्यांकरिता 5G किती वेगाने असेल, हे सांगणे अशक्य राहिले आहे.

परंतु, नेटवर्क स्पीड वाढणार आहे. हे मात्र नक्की असल्याचे, वर्तवले जात आहे. ओक्लाचे मूल्यांकन आणि सरासरी डाउनलोड स्पीडमध्ये 10x पर्यंत वाढ शोधणे हे आशियाई देशांमध्ये नेटवर्कच्या इंटरनेट स्पीडच्या चाचणीवर आधारित राहणार आहे. जेथे 5G सेवा नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ, थायलंड आणि फिलिपिन्समध्ये, ज्याठिकाणी २०२० च्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत व्यावसायिक 5G सेवा सुरू करण्यात आले होते.

हे देखील पहा-

5G नेटवर्कवर इंटरनेट डाउनलोड गती २३१.४५ Mbps आणि १५१.०८ Mbps पर्यंत पोहोचले आहे. 4G चा स्पीड २५.९९ Mbps आणि १५.१२ Mbps इतका होता. ओक्लाच्या मते, भारतात, रिलायन्स जिओ इन्फोकॉमची डाउनलोड स्पीड, ज्याने 5 जी चाचणीत आघाडीचे स्थान राहिले आहे. मागील ६ महिन्यांमध्ये अगोदरच वाढलेली बघायला मिळाली आहे.

भारतामध्ये ऑपरेटरची सरासरी डाउनलोड गती ही मार्च २०२१ मध्ये ५.९६ Mbps वरून, जूनमध्ये १३.०८ Mbps इतकी झाली आहे. त्याची अपलोड गती आणि सतत स्कोअर देखील लक्षणीय सुधारला असल्याचे ओक्लाने यावेळी सांगितले आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम, भारती एअरटेल आणि VI या ३ खाजगी टेलिकॉम दूरसंचार विभागात स्पेक्ट्रम वाटपाचा स्पष्ट रोड मॅप आणि 5G फ्रिक्वेंसी बँड तयार करण्याची विनंती केलेली आहे.

5G रोल आऊटमध्ये भारत जागतिक बाजारपेठांत मागे पडलेला आहे. तरी देखील ऑपरेटर्सना शेवटी फायदा होऊ शकणार आहे. कारण ते कमी किंमती मध्ये नेटवर्क उपकरणे खरेदी करू शकत आहेत. तसेच भारतीय ऑपरेटरद्वारे ओपन आरएएन प्रणालीचा अवलंब केल्यामुळे 5 जी रोल आउटची एकूण किंमत कमी होण्यास मदत होणार आहे. 5G स्मार्टफोनच्या किंमती मध्ये अगोदरच घसरली आहे. हा ट्रेंड कायम राहणार आहे. जिओ प्लॅटफॉर्मच्या भारत देशात गुगलसोबत भागीदारी असली तर हे सगळे सहज शक्य होणार असल्याचे म्हंटले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT