Accident Twitter/ANI
देश विदेश

Horrific Accident In UP: वऱ्हाडींवर काळाचा घाला; अपघातात 5 जणांचा मृत्यू

हे सर्व यूपी-उत्तराखंड सीमेवर असलेल्या स्वार शहरात लग्न समारंभासाठी गेले होते. तिथून घरी परतत असताना अचानक कारचं नियंत्रण सुटलं आणि समोरून जाणाऱ्या ट्रकवर ही कार धडकली.

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशात - रामपूरमधील तांडा भागात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार, एका अनियंत्रित कारनं ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) कारमध्ये चालकासह 6 जण होते, त्यापैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रामपूर जिल्ह्यातील तांडा पोलीस स्टेशन परिसरात हा भीषण अपघात झाला. हे सर्व यूपी-उत्तराखंड सीमेवर असलेल्या स्वार शहरात लग्न समारंभासाठी गेले होते. तिथून घरी परतत असताना अचानक कारचं नियंत्रण सुटलं आणि समोरून जाणाऱ्या ट्रकवर ही कार धडकली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ जाऊन मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवले आहे. त्याचबरोबर जखमी चालकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

घटनास्थळाजवळ क्रॉसरोड असून येथील स्पीड ब्रेकर क्रॉस केल्यानंतर पुढे कारचे नियंत्रण सुटले असल्याची शक्यता आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मुरादाबादमधील जयंतीपूर येथील रहिवासी आहेत. ही अनियंत्रित कार कोणत्या ट्रकला धडकली याचाही शोध घेतला जात आहे अशी माहिती टांडाचे एसडीएम राजेश कुमार यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT