Uttar Pradesh Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News : पत्नीला दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; पतीचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

आरोपी शरद याने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी ही एका दहावीच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली होती.

Satish Daud

गोरखपूर : गेल्या काही दिवसांपासून देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज गुन्हेगारीच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. यातील काही गुन्हे हे प्रेमसंबध आणि अनैतिक संबंधातून घडत आहे. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातून समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. (Latest Marathi News)

पत्नीच्या हत्येनंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. साहेब मला अटक करा, मी माझ्या पत्नीची हत्या (Crime News)  केली आहे, असं म्हणत त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे.

शरदचंद्र पाल असं आरोपी पतीचं नाव आहे. तो एका नामांकित शाळेतील बसवर ड्रायव्हरची नोकरी करतो. पोलिसांनी शरदचंद्र याला पत्नीची हत्या का केली? असा सवाल विचारला असता, त्याने अशी काही घटना सांगितली, की जी ऐकूण पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.

आरोपी शरदचंद्र यांने पोलिसांना (Police) दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी आणि तो एका नामांकित शाळेच्या बसवर नोकरी करत होते. शरद हा बस ड्रायव्हर होता, तर त्याची पत्नी याच बसवर क्लिनर होती. बसमध्ये बसलेल्या मुलांची देखरेख करायची. कुणाला कोणत्या स्टॉपवरवर सोडवयाचं आणि कुठून विद्यार्थ्यांना घ्यायचं हे तिला चांगलंच माहित होतं.

पत्नीचे होते दहावीच्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध

आरोपी शरद याने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी ही एका दहावीच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली होती. या विद्यार्थ्याचे आई-वडील एका मोठ्या बँकेत नोकरी करतात. घरी कुणी नसल्याने ती सदरील विद्यार्थ्याच्या त्याच्या घरापर्यंत सोडायला जायची. तिथूनच मी घरी जाईल असा बहाणा सांगत ती त्याच्यासोबत शारीरिक संबंध (Relationship) ठेवायची.

पत्नी दररोज या विद्यार्थ्याला त्याच्या घरी सोडवायला जाते आणि तिथूनच आपल्या घरी का निघून जाते? असा प्रश्न शरदचंद्र याला पडला होता. दरम्यान, एकेदिवशी त्याने पत्नीसह विद्यार्थ्याचा चोरून पाठलाग केला. तेव्हा पत्नी या दहावीच्या विद्यार्थ्यासोबत त्याच्या घरात गेली. तिथे जाताच तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान, शरद हा पत्नीच्या आधी घरी पोहचला. त्याने मद्यप्राशन सुद्धा केलं होतं. यावेळी पत्नीचे आणि त्याच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात त्याने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. शरदचे म्हणणे आहे की, त्याच्या पत्नीचे या विद्यार्थ्यासोबत वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. सध्या शरदचंद्र हा पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT