Florida Plane Crash Saam Tv
देश विदेश

Florida Plane Crash : फ्लोरिडाच्या गल्फ कोस्टजवळ विमान कोसळलं; 2 महिलांसह 4 जणांचा मृत्यू

Plane Crash : विमान अपघातात दोन महिलांसह चार जणांचा मृत्यू

Shivani Tichkule

America News : अमेरिकेतील फ्लोरिडाच्या गल्फ कोस्टजवळ गुरुवारी एक विमान कोसळले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली आहे. या विमान अपघातात दोन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, व्हेनिस विमानतळावरून (Airport) या विमानाने उड्डाण घेतली होती आणि पश्चिमेकडील मेक्सिकोच्या आखातात ते कोसळलं. व्हेनिसचे पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित लोकांनी 911 वर कॉल करून विमान अपघाताची माहिती दिली.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, विमानतळावर उपलब्ध असलेले सिसिटीव्ही फुटेज आणि अपघातस्थळाचा आढावा घेतला जाणार आहे. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या प्रकरणाची चौकशी करत असून सिसिटीव्ही फुटेज त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

पुढं ते म्हणाले की, काही वेळापूर्वी पाईपर पीए-32आर हे विमान सुमारे 23 फूट पाण्याखाली दिसले. विमान अपघातात ठार झालेल्या चार जणांची ओळख पटली आहे. विल्यम जेफ्री लम्पकिन (64), पॅट्रिशिया लम्पकिन (68) रिकी जो बीव्हर (60) एलिझाबेथ अॅनी बीव्हर (57) अशी पीडितांची नावे आहेत. 

ते पुढं म्हणाले, दुपारी काही वेळापूर्वी पाईपर PA-32R विमान सुमारे 23 फूट पाण्याखाली दिसलं. विमान अपघातात ठार झालेल्या चौघांची ओळख पटली आहे. विल्यम जेफ्री लम्पकिन (64), पॅट्रिशिया लम्पकिन (68), रिकी जो बीव्हर (60), एलिझाबेथ अॅनी बीव्हर (57) अशी मृत व्यक्तींची नवे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

SCROLL FOR NEXT