India Corona Update
India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: काळजी घ्या! देशात 24 तासात 3,37,704 नवे कोरोना रुग्ण

वृत्तसंस्था

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संसर्गासोबतच कोरोना मृतांचा आकडाही सातत्याने वाढत आहे. देशात कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,37,704 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासात 488 जणांचा मृत्यू झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 2,42,676 जण कोरोनमुक्त झाले आहेत. तर, नवीन प्रकरणांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 21,13,365 झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 17.22 टक्के इतका झाला आहे. (India Corona Latest News Update)

राज्यात गेल्या 24 तासात 48,270 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 74,20,027 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 42,391 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 70,09,823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.गेल्या 24 तासात 52 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,42,023 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,64,388 रुग्ण अॅक्टीव आहेत.

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

देशात कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या देखील वेगाने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या व्हेरिएंटच्या 1,171 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 144 ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत 2,343 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 10,050जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT