धक्कादायक! तामिळनाडूत एकाचवेळी आढळले 33 नवीन ओमिक्रॉन रुग्ण SaamTV
देश विदेश

धक्कादायक! तामिळनाडूत एकाचवेळी आढळले 33 नवीन ओमिक्रॉन रुग्ण

तामिळनाडूमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron) एकाचवेळी 33 रुग्ण आढळून आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्याकरिता सरकारचे प्रयत्न सुरू असताना आता तामिळनाडू (Tamil Nadu) मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron) एकाचवेळी ३३ रुग्ण आढळून आले आहेत. तामिळनाडूत ओमिक्रॉनचा चांगलाच स्फोट झाल्याचा दिसून येत आहे. राज्यामध्ये Omicron चे ३३ नवीन रुग्ण आढळले आहेत.

हे देखील पहा-

राज्याचे आरोग्य मंत्री (Health Minister ) एम. सुब्रमण्यम यांनी याविषयी माहिती दिली आहे. राज्यामध्ये ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णाची संख्या ३४ झाली आहे. या अगोदर केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीमध्ये तामिळनाडूनत फक्त १ रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता. याचबरोबर देशातील ओमिक्रॉनचा वाढता धोका आणि कोरोनाच्या (Corona) परिस्थितीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) थोड्याच वेळात आढावा बैठक घेणार आहेत.

एकीकडे तामिळनाडू मधून ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले असताना दुसरीकडे, पश्चिम बंगाल (West Bengal) मधील शाळेत कोरोनाचा स्फोट झाला आहे. एका शाळेत २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पश्चिम बंगाल मधील कल्याणी (Kalyani) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ९ वी आणि १० वी च्या एकूण २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती मी मिळाली आहे.

संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन (Quarantine) करण्यात आले आहे. त्यांना सर्दी आणि कफ आहे. त्यांच्या पालकांना याची माहिती दिली गेली आहे. विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे, अशी माहिती शाळेच्या प्राचार्य मौसमी नाग यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता पंतप्रधान मोदी आज बैठक घेणार आहेत. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी साडेसहा वाजता ही बैठक घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT