Corona Latest News Updates, Corona Latest Marathi News Saam Tv
देश विदेश

कोरोनाचा 'सुपर स्पीड'! देशात गेल्या २४ तासांत ३२०७ नवे रुग्ण; २९ जणांचा मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीत रुग्ण संख्येत जास्त वाढ होत आहे.

साम टीव्ही ब्युरो

वृत्तसंस्था: देशात कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा घटताना दिसत आहे. देशात दररोज कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत किंचित घट होत आहे. मागील २४ तासांत देशात ३२०७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढलेल्या रुग्णांमधील जास्त रुग्ण वाढ देशाची राजधानी दिल्लीत आहे. दिल्लीमध्ये (Delhi) गेल्या २४ तासामध्ये हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. (Corona Latest News Updates)

हे देखील पाहा-

दिल्ली राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीत काल दिवसभरात १४२२ नवीन कोरोना (Corona) रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. दिल्लीत रोजच कोरोना रुग्ण सकारात्मकता दर ५.३४ टक्क्यावर येऊन पोहोचला आहे. तर देशातील दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर ०.०५ नोंदवला गेला आहे.

देशात नव्या रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार ४०३ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दिवसभरात ३ हजार ४१० रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात २९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

याबरोबरच देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५ लाख २४ हजार ९३ इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरात देशव्यापी लसीकरणात १३ लाख ५० हजार ६२२ लसी देण्यात आल्या आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंत १९० कोटी ३४ लाख ९० हजार ३९६ लसी देण्यात आल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT