Viral News Saam TV
देश विदेश

Viral News: देव तारी...पाणघोड्यानं २ वर्षांच्या मुलाला गिळलं, काही वेळातच चमत्कार घडला...

लहान मुलाला पाणघोडा गिळत आहे हे पाहून एका व्यक्तीने पाणघोड्याला दगड मारल्याने २ वर्षांच्या चिमुकल्याला जीवनदान मिळाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Viral News: अफ्रिकेतील युगांडा येथे एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका २ वर्षांच्या चिमुकल्याला पाणघोड्याने जिवंत गिळलं आणि नंतर मुलाला थुंकून दिलं आहे. या धक्कादायक घटनेत चिमुकला सुखरूप आहे. पाणघोड्याने त्याला गिळल्यावर तिथे उपस्थित एका व्यक्तीने पाणघोड्याला दगडं (Stone) मारायला सुरूवात केली. त्यामुळे त्याने लहान मुलाला थुंकून दिले. (Latest Marathi News)

समोर आलेल्या माहितीनुसार, युगांडातील कॅटवे काबातोहो शहरात असलेल्या तलावाजवळ (Lake) ही घटना घडली आहे. सदर लहान मुलगा याच तलावाजवळ राहतो. आई घरात असताना तो खेळता खेळता तलावाजवळ आला. पाणघोडा देखील तिथेच होता. त्याला भूक लागल्याने त्याने चिमुकल्याला खाल्ले. लहान मुलाला पाणघोडा गिळत आहे हे पाहून एका व्यक्तीने पाणघोड्याला दगड मारल्याने २ वर्षांच्या चिमुकल्याला जीवनदान मिळाले आहे.

क्रिस्पास बॅगोन्झा असे मुलाचा जीव वाचवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर मुलाला लगेच बवेरा शहरातील रुग्णालयात दाखल केले. सोशल मीडियावर @gorillasights या ट्विटर अकाऊंटवर या मुलाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. सध्या सोशल मीडियावर २ वर्षांचा चिमुकला आणि त्याच्याबरोबर घडलेल्या प्रसंगाची चर्चा रंगली आहे. हा एक चमत्कार असल्याचे अनेक जण म्हणत आहेत. तसेच मुलाच्या आईने मुलाचा जीव वाचवलेल्या व्यक्तीचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताखालील जांबाची वाडी धोक्यात, जमिनीला पडू लागल्या भेगा

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Raj Thackeray: १२ वर्षात तुम्ही जे पेरलंय तेच उगवलंय; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! २०३० - ३१ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला येणार ६,००० रुपये

SCROLL FOR NEXT