जियेंगे भी साथ मै और मरेंगे भी साथ मे; दोन जीवलग मित्रांचा गायीला वाचवतानाच मृत्यू Saam Tv
देश विदेश

जियेंगे भी साथ मै और मरेंगे भी साथ मे; दोन जीवलग मित्रांचा गायीला वाचवतानाच मृत्यू

रस्त्यावर असलेल्या गायींना वाचवत असताना कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये रस्ते अपघातामध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर दोन्ही मित्रांनी एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला, तर कार चालवत असलेल्या मित्राने उडी मारून जीव वाचवला आहे. रस्त्यावर असलेल्या गायींना वाचवत असताना कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे.

हे देखील पहा-

२ हिंदुत्ववादी नेते लखन नजर आणि लेखराज त्यांचा मित्र राहुल जोशीबरोबर कारने खुजनेर रोडवरून जात असतानाच. तितक्याच समोर काही गायी आले होते. त्या गायींना वाचवण्याकरिता राहुलने कारची दिशा बदलली होती. मात्र, त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने, कार उलटली आणि एका विहिरीत पडली आहे. यामध्ये २ जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ४ तासांनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

यावेळी दोघांचे हात एकमेकांच्या खांद्यावर होते. मरणानंतरही देखील एकमेकांची साथ न सोडलेल्या २ मित्रांना बघून उपस्थितांचे डोळे पाणावले आहेत. लखन नेजर आणि लेखराज सकाळपासून रात्रीपर्यंत सोबत राहत असायचे, अशी माहिती त्यांचा मित्र सुनील नागरने दिली आहे. लखन आणि लेखराज दिवसभर सोबत असायचे. त्यांचे खाने-पिणे एकत्र असायचे. दोघांची मैत्री अतिशय घट्ट होती.

आम्ही सोबत जगू आणि सोबतच मरू, असे दोघे देखील म्हणायचे. त्यांचे हे शब्द अखेर खरे ठरले आहे, असे नागरने सांगितले आहे. लखन आणि लेखराज दोघे देखील विद्यार्थी नेते होते. विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक म्हणून त्यांनी काम बघत होते. तिथेच दोघांची मैत्री झाली. राजगढमध्ये कुठेही जखमी अवस्थेत गोवंश आढळून आल्यास दोघे देखील तातडीने तिथे पोहोचून उपचार करायचे. मात्र, त्याच गोवंशाला वाचवत असताना त्यांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात वाहन चालकाचा अजब प्रकार, चारचाकी वाहन चालकाची थेट डिव्हायडरला धडक

Cheese paratha recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता हा चीज पराठा; झटपट तयार होणार पदार्थ मुलांनाही आवडेल

Ashok Kharat: भोंदू खरातच्या जिवाला धोका? SIT नं घेतला मोठा निर्णय, कोर्टाकडूनही ग्रीन सिग्नल

Ramayana Teaser: हनुमान जयंतीला आला 'रामायण'चा टिझर, रणबीर कपूर बनला 'पुरुषोत्तम राम'; नेटकरी एका सुरात म्हणाले शानदार!

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ₹४६००० होण्याची शक्यता; पगार ३४ टक्क्यांनी वाढणार

SCROLL FOR NEXT