Corona Cases Today Saam TV
देश विदेश

Corona Cases Today: दिलासादायक! देशात गेल्या 24 तासात 1761 नवे कोरोनाबाधित रुग्ण

देशामध्ये आज देखील कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशामध्ये आज देखील कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात कोरोना विषाणूचे १ हजार ७६१ नवीन रुग्ण आढळले असून १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. काल २ हजार ७५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी ३० लाख ७ हजार ८४१ कोरोनाबाधित (corona) रुग्ण आढळले आहेत.

हे देखील पहा-

सक्रिय प्रकरणांची संख्या २६ हजार २४० इतकी कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरामध्ये देशात ३ हजार १९६ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णाची संख्या २६ हजार २४० इतकी झाली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख १६ हजार ४७९ झाली आहे.

देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ६५ हजार १२२ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १८१ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १८१ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरामध्ये १५ लाख ३४ हजार ४४४ डोस देण्यात आले आहेत.

आतापर्यंत १८१ कोटी २७ लाख ११ हजार ६७५ डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटींपेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT