Crime News  Saam Tv
देश विदेश

Surat Tragedy: आई वडील केक खरेदी करायला गेले, वाढदिवसालाच मुलानं आयुष्य संपवलं; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Tragic Birthday in Surat: सुरत येथे १६ वर्षीय विद्यार्थ्याने वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या केली. पालक केक आणायला गेले असताना त्याने गळफास लावून आत्महत्या केली. परिसरात शोककळा पसरली आहे.

Bhagyashree Kamble

गुजरातच्या सुरत शहरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने वाढदिवसालाच आत्महत्या केली आहे. त्याचे पालक सायंकाळच्या पार्टीसाठी केक आणण्यासाठी बाहेर गेले होते. या दरम्यान, त्याने घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं. पालकांनी मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर शेजारच्यांनी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे.

आशुतोष प्रधान असे मृत मुलाचे नाव आहे. तो नववीत शिकत होता. तो सुरतमधील भिस्तानच्या विजयलक्ष्मी नगर भागात आपल्या पालकांसोबत राहत होता. त्याला एक बहीण देखील आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आशुतोषचा वाढदिवस असल्याकारणाने त्याच्यावर मित्र आणि नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. आशुतोषचे पालक केक खरेदी करण्यासाठी बाहेर गेले होते. यादरम्यान, आशुतोषने टोकाचं पाऊल उचललं.

त्याने पडद्याच्या रॉडला गळफास लावत आत्महत्या केली. घरात पालक केक घेऊन आले. त्यावेळी त्यांना समोरचं दृष्य पाहून धक्का बसला. मुलाचा मृतदेह पाहून आई वडील जोरात किंचाळले. शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. दिंडोली पोलिसांनी आशुतोषला रूग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आशुतोषने जेव्हा आत्महत्या केली, तेव्हा त्याची बहीण कामावर होती.

या घटनेनंरतर संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, 'या घटनेनंतर आम्ही अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलाने नक्की आत्महत्या का केली? याचा तपास सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

Factory Fire: मृत्यूचे तांडव! चप्पल कारखान्यात भीषण आग, २८ जणांचा होरपळून मृत्यू

औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT