Corona Update Saam Tv
देश विदेश

कोरोनाने टेन्शन वाढवलं! देशात 13 हजार 216 नवीन कोरोनाबाधित

तर गेल्या 24 तासांत 8 हजार 148 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना (Corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. अशातच गेल्या देशभरात कोरोनाच्या नवीन रुग्णात लक्षणीय वाढ झाली. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल13 हजार 216 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, गेल्या 24 तासात 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पाहा -

तर गेल्या 24 तासांत 8 हजार 148 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.63 टक्क्यांवर पोहोचलं आहे. आतापर्यंत एकूण 4 कोटी 26 लाख 90 हजार 845 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 68 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 68 हजार108 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात गेलाय 24 तासात 4165 नवीन रुग्णांची नोद झाली आहे. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 21,749 वर पोहोचली आहे. याशिवाय, दिवसभरात तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 3047 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाने बरे झालेल्यांची संख्या 77,58,230 इतकी झाली आहे. राज्यात दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 1,47,883 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनातून बरे होण्याचा दर 97.86 टक्के एवढा आहे. तर मृत्यूदर1.86टक्के इतका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT