Corona Cases Update in India | Corona patient Updates Saam TV
देश विदेश

Corona Cases Today: दिलासादायक! गेल्या 24 तासांत 1270 नवे कोरोनाबाधित रुग्ण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशात कोरोना (corona) विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये १०.६ टक्क्यांची घट होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात कोरोना विषाणूचे १२७० नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे १४२१ रुग्ण नोंदवले गेले आणि १४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

सक्रिय प्रकरणांची संख्या सध्या १५ हजार ८५९ इतकी कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार दिवसभरामध्ये देशात १ हजार ५६७ रुग्ण कोरोनातून (corona) बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ८५९ वर पोहोचली आहे. कोरोना विषाणुमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार ३५ झाली आहे.

देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ८३ हजार ८२९ रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १८३ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १३ कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. रविवार दिवसभरामध्ये ४ लाख २० हजार ८४२ डोस देण्यात आले आहेत.(Corona Cases Update in India)

आतापर्यंत लसीचे १८३ कोटी २६ लाख ३५ हजार ६७३ डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांवर लोकांना २ कोटींपेक्षा जास्त प्रतिबंधात्मक लस देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

Blood Test for Depression : ब्लड टेस्टने ओळखता येणार मानसिक आजार? तंत्रज्ञानामुळे निदान होणार झटपट ? पाहा VIDEO

EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्तीनंतर मिळणार १ कोटी रुपये, जाणून घ्या कसे?

Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांना आताच फोन लावा, त्या अधिकाऱ्याला इथूनच आऊट करतो; मनोज जरांगे कुणावर भडकले?

Accident News: लातूर- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स उलटली; अनेकजण जखमी

SCROLL FOR NEXT