Ghaziabad News Saam TV
देश विदेश

VIDEO: तीन कुत्रे एकाच मुलिवर आले धावून; भयानक हल्ल्यात मुलगी जखमी

भटक्या कुत्र्यांमुळे सदर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

साम वृत्तसंथा

Ghaziabad News : मुंबईसह दिल्ली आणि अन्य शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. शांतता असेल आणि एखादी व्यक्ती किंवा लहान मुलं एकटी असली की कुत्रे त्यांचेच राज्य असल्याप्रमाणे हल्ला करतात. यात आजवर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे माणसांवर हल्ला चढवण्याचे हे प्रमाण जास्त वाढत आहे. अशात उत्तर प्रदेशमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. एका लहान मुलीवर ३ कुत्र्यांनी हल्ला केला आहे. यात मुलगी जखमी झाली आहे.

सदर घटना ही उत्तर प्रदेशच्या गाझीयाबाद (Ghaziabad) येथील आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात भव्या गुप्ता या ११ वर्षीय मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केला. ती सोसायटीमध्ये जात असताना रसत्यावर शांतता होती. त्यामुळे एकत्र तीन कुत्रे तिच्या दिशेने धावत आले. कुत्र्यांना पाहून सोसायटीतील सुरक्षा रक्षकाने त्यांना हकलवून लावले. मात्र तोपर्यंत एका कुत्र्याने भव्याच्या पायाचा चावा घेतला होता.

इंदिरापूरच्या वैशाली सेक्टर ७ येथील रामप्रस्थ सोसायटीतील ही घटना आहे. यात सुरक्षा रक्षकामुळे मुलीला जास्त दुखापत झाली नाही. मात्र एका कुत्र्याने हिंसक पध्दतीने तिच्या पायाचा चावा घेतला. अशात आता भटक्या कुत्र्यांमुळे सदर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भव्याच्या पायाला कुत्रा चावल्याने तिला तात्काळ जवळील रुग्णालयात (Hospital) दाखल केले गेले. तसेच रेबीचचे इंजेक्शन देखील देण्यात आले आहे.

सदर घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हायरल होत आहे. शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचे हल्ले जास्त प्रमाणात वाढत आहेत. या आधी देखील एका लहान मुलावर कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला होता. यात त्या मुलाच्या पाठीला, पोटाला, पायाला आणि गळ्याला कुत्र्याने चावा घेतला होता. यात तो चिमुकला खूप जखमी झाला. शहरी भागात भटके कुत्रे हे चिंतेची मोठी बाब बनले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पायात ही लक्षणं दिसतील तर व्हा सावध, असू शकते या आजाराचे लक्षण

Maharashtra News Live Update: सरकारने देशाचे वाटोळे केले - अभिजीत दिपके

बचावासाठी दुकानात TMC नेता लपला, पण साड्यांच्या बंडलमधूनच पकडला गेला, व्हिडिओ व्हायरल

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT