11 nurses got pregnant together in USA Saam TV
देश विदेश

रुग्णालयातील ११ नर्स एकाच वेळी गरोदर; ३ वर्षांपूर्वीही इथं असंच घडलं होतं

11 nurses got pregnant together in USA : यातील एक डॉक्टर तर १० नर्स असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral News : अमेरिकेतल्या एका गंमतीशीर घटनेने सर्वांचच लक्ष वेधलं आहे. अमेरिकेल्या एका रुग्णालयात एकत्र काम करणाऱ्या १० हून अधिक नर्सेस (परिचारिका) या एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. होय, या रुग्णालयात काम करणाऱ्या ११ वैद्यकीय कर्मचारी (Nurse) एकाच वेळी गर्भवती (Pregnant) झाल्या आहेत. हे प्रकरण अमेरिकेतील (USA) मिसूरी येथील आहे, जिथे रुग्णालयात काम करणाऱ्या ११ परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या. यातील एक डॉक्टर तर १० नर्स असल्याचे सांगण्यात येत आहे. (11 nurses got pregnant together in USA)

हे देखील पाहा -

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यातील दोन महिलांची प्रसूती एकाच दिवशी होणार आहे. या सर्व जणी मिसूरी येथील लिबर्टी हॉस्पिटलमध्ये काम करतात. दुसरीकडे, योगायोग असा की, त्यापैकी बहुतेक जणी या डिलिव्हरी (प्रसूती) विभागात काम करतात. बर्थिंग सेंटरच्या (प्रसूती विभाग) संचालक निकी कॉलिंग म्हणाल्या की 'ते नेहमी एकत्र काम करतात, परंतु आमच्याकडे एकाच वेळी १० जणी प्रेग्नेंट नव्हत्या. मजा आली... 'या वर्षी या सर्व महिला मुलांना जन्म देण्याच्या तयारीत आहे. पहिली प्रसूती पुढील काही आठवड्यांत होऊ शकते. प्रसूती परिचारिका केटी बेस्टजेन २० जुलै रोजी आई होणार आहे, तर थेरेसी या २७ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाळाला जन्म देणार आहे.

याशिवाय २७ मे ला दोन परिचारिका अॅचेसन आणि अॅलिसन हॅरेल या एकाच दिवशी बाळाला जन्म देणार आहेत. रुग्णालयातील एकाच विभागात इतके वैद्यकीय कर्मचारी गर्भवती असताना सर्वांनीच एकमेकांची चेष्टा सुरू केली आहे. यादरम्यान एका नर्सने सांगितले की, जे गरोदर नाहीत त्यांना डे केअर सुविधा उघडण्याची चांगली संधी आहे. नर्सिंग स्टाफचे अनेक सदस्य एकाच वेळी गर्भवती होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्येही, मुख्य वैद्यकीय केंद्रातील लेबर आणि डिलिव्हरी युनिटमध्ये काम करणाऱ्या नऊ परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या होत्या आणि त्यादरम्यान सर्व परिचारिकांनी एकमेकांच्या प्रसूतीसाठी तेथे येण्याचे नियोजन केले होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT