Corona Cases Update in Maharashtra| Covid Restriction Updates Saam TV
देश विदेश

Corona Cases Today: देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1096 नवे रुग्ण, 81 मृत्यू

देशात आज कोरोना (Coronavirus) विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशात आज कोरोना (Coronavirus) विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात कोरोना विषाणूचे १०९६ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. काल १२६० कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरामध्ये देशात १ हजार ९१८ लोक बरे झाले होते. देशात सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ६७२ झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार १८१ झाली आहे. देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ९० हजार ९२२ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी ३० लाख २५ हजार ७७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत १८४ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १८४ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभरामध्ये २३ लाख ५७ हजार ९१७ डोस देण्यात आले आहेत.

देशामध्ये आतापर्यंत १८४ कोटी ३१ लाख ८९ हजार ३७७ डोस लसीचे देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटींपेक्षा जास्त कोरोना लसी देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT