zepto news  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: आईस्क्रिम खाताय, सावधान....एवढे वाचाच...

Zepto controversy: तुम्ही फूड डिलीवरी मार्फत खाद्यपदार्थ मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे,साम टीव्ही

मुंबई: आजकालच्या व्यस्त जीवनात लोकांचा सहसा घरात जेवण करण्याऐवजी बाहेरून अन्न मागवण्याचा कल वाढला आहे. मात्र, फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून ग्राहकांना खराब किंवा बुरशी लागलेले अन्न दिले जाण्याच्या घटना सतत वाढत आहेत. असाच एक प्रकार मुंबईतील अंधेरी येथे घडला असून, झेप्टो कंपनीने ग्राहकाला बुरशी लागलेले कोरनेटो आईस्क्रीम दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

अंधेरी पूर्वेतील मरोळ परिसरात राहणाऱ्या निकिता चव्हाण यांनी झेप्टो अॅपवरून हिंदुस्तान यूनिलीवर कंपनीचे कोरनेटो डबल चॉकलेट आईस्क्रीम ऑर्डर केले होते. मात्र, डिलिव्हरीनंतर त्यांनी आईस्क्रीम उघडले असता त्यात मोठ्या प्रमाणात बुरशी आढळली.

या प्रकारानंतर निकिता चव्हाण यांनी MIDC पोलीस स्टेशन येथे झेप्टो कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच मनसे अंधेरी विधानसभा अध्यक्ष रोहन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी झेप्टो कंपनीबाहेर आंदोलन केले. त्यांनी झेप्टो कंपनीवर त्वरित कारवाई करून कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. रोहन सावंत यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर झेप्टो कंपनीवर तातडीने कारवाई झाली नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.

या घटनेमुळे फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम?

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT