Pawan Jadhav  Saam TV
मुंबई/पुणे

Political News : शिवसेनेत प्रवेशाची ऑफर खुली धुडकावली, ठाकरे गटाच्या पवन जाधवांचं शिंदे गटाला चोख उत्तर

Political News : पवन जाधव यांनी पत्रक जारी करत शिंदे गटात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Mumbai News : मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव आणि त्यांचे चिरंजीव युवासेना कार्यकारणी सदस्य पवन जाधव यांना शिंदे गटात येण्याची खुली ऑफर मिळाली आहे. मात्र पवन जाधव यांनी पत्रक जारी करत शिंदे गटात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पवन जाधव यांनी म्हटलं की, काहीही आमिष दाखवलं तरी शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे परिवार आणि माझे मित्र आदित्य ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही. शिंदे साहेब आणि त्यांच्या सगळ्या इमानी कट्टर सैनिकांना विनंती आहे की माझा आणि माझ्या परिवाराचं शिंदे गटात प्रवेश करायचं स्वप्न सोडून द्या. (Latest Marath News)

शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे परिवार आणि माझे जिवलग मित्र आदित्यजी ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही. काहीही अमिशं दाखवली तरी, असं पवन जाधव यांनी म्हटलं आहे. (Political News)

हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझे आजोबा स्वर्गीय मुकुंद अण्णा जाधव यांच्या ऋणानुबंधापुढे कसलाचं विचार करता येणार नाही. आम्ही कायम एकनिष्ठ, असं पवन जाधव यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जातात. पवन जाधव यांनी कुटुंबियांसोबत शिंदे गटात प्रवेश करावा अशी ऑफर शिंदे गटाकडून आली असल्याची माहिती आहे. श्रद्धा जाधव यांच्या जाचाला कंटाळून माजी नगरसेवक अमेय घोले यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT