Yugendra Pawar Engagement Saam Tv
मुंबई/पुणे

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब एकत्र; पाहा VIDEO

Yugendra Pawar And Tanishka KulkarniEngagement: शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचा साखपुडा आज संपन्न झाला. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा प्रभादेवी येथे साखरपुडा झाला. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

Priya More

Summary -

  • युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा मुंबईत संपन्न झाला.

  • युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्या निमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले.

  • पारंपरिक पद्धतीने पार पडला साखरपुडा. फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखपुडा आज संपन्न झाला. मुंबईतल्या प्रभादेवी येथील तनिष्काच्या घरी पारंपारिक पद्धतीने साखपुड्याचा कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र आले होते. या साखपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी हे दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. युगेंद्र पवार आणि तनिष्का यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

युगेंद्र आणि तनिष्का यांच्या साखरपुड्याला अजित पवार यांनी सहकुटुंब हजेरी लावली. त्याचसोबत शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे देखील आपल्या कुटुंबीयांसोबत आले होते. युगेंद्र पवार यांच्यापूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पुण्यात पार पडला होता. तेव्हा देखील पवार कुटुंबीय एकत्र आले होते. त्यानंतर युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र पवार हे तरुण नेते असून काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सक्रीय राजकारणात एन्ट्री केली होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीत काका अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यात अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा झाला होता. जय पवार यांचा साखरपुडा उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांच्यासोबत झाला होता. पुण्यामध्ये मोठ्या थाटामाटात हा साखरपुडा पार पडला होता. पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा संपन्न झाला. साखरपुड्याला शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य उपस्थित होते. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीयांचा ग्रुप फोटो काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT