पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबार; तरुणाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबार; तरुणाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात घडलेली गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवडमधून (Pimpari Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : पुण्यात घडलेली गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवडमधून (Pimpari Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात असलेल्या कातेपूरम चौकात ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा-

अज्ञाताकडून गोळीबार !

घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील कातेपूरम येथे सकाळच्या ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने तरुणावर गोळीबार करुन घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेत पीडित तरुण जखमी झाला होता, त्यास उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान, या तरुणाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळत आहे. तर मृतकाचे नाव योगेश जगताप असे आहे.

गोळीबाराचे कारण काय?

हा गोळीबार का करण्यात आला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्ला आणि गोळीबाराची ही घटना एका सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Currency note serial number: नोटांवरचा सिरीयल नंबर नेमका काय सांगतो? जाणून घ्या रहस्य

Maharashtra News Live Update: सोनीया गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सौंदर्याने केलाय राडा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

PMC News : व्यसनमुक्तीच्या चळवळीला पुणे पालिकेची पोचपावती; डॉ. सोमनाथ गितेंचा विशेष सत्कार

Shocking : स्वातंत्र्यदिनी दुःखद घटना! ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान शिक्षकाचा मृत्यू; सांगलीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT