प्लॅटफॉर्मवरच तरुणाला हृदयविकाराचा झटका, रेल्वे पोलिसाने सीपीआर देत वाचवले प्राण (Video) अजय दुधाणे
मुंबई/पुणे

प्लॅटफॉर्मवरच तरुणाला हृदयविकाराचा झटका, रेल्वे पोलिसाने सीपीआर देत वाचवले प्राण (Video)

पोलिसाच्या तत्परतेच्या उपचारांनी तरुण पुन्हा आला शुद्धीत

अजय दुधाणे

अंबरनाथ - रेल्वे पोलिसाने एका तरुणाला सीपीआर देत त्याचे प्राण वाचवल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकात घडली आहे. ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर १५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास महेश सुर्वे नावाचा २२ वर्षीय तरुणाच्या छातीत अचानक दुखू लागलं आणि तो खाली कोसळला. यावेळी तिथे उपस्थित रेल्वे पोलीस कर्मचारी मोहन दास यांनी धाव घेत महेश सुर्वे याला सीपीआर पद्धतीने प्राथमिक उपचार दिले.

त्यामुळं काही वेळातच महेश हा शुद्धीवर आला. ही घटना रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने महेश याला रेल्वे स्थानकातील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून त्याला नातेवाईकांसोबत घरी पाठवण्यात आले. रेल्वे पोलिसाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचवल्याने सध्या रेल्वे पोलीस मोहन दास यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Neck Darkness Removal: टॅनिंगमुळे मान काळवंडली? करून पाहा 'हा' उपाय; त्वचेला काळेपणा होईल कमी

Pancakes Recipe: रविवारी नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि स्वादिष्ट पॅनकेक्स, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गर्जना मोर्चात सहभागी होणार

Bus Accident News : घाटात भीषण अपघात! ५४ प्रवाशांना अंत्यविधीसाठी घेऊन जाणारी बस पलटली; ४ महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT