Pune Woman Vulgar Video  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात तरुणीचा लग्नाला नकार, तरुणानं नको ते केलं, शरीरसंबंधाचे 'ते' VIDEO शूट; मैत्रिणीला दिसताच भयंकर उलगडा

Pune Woman Vulgar Video : संबंधित तरुणी एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करीत आहे. विनय कुलकर्णी हा अ‍ॅटोमोबाईल इंजिनिअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

Prashant Patil

पुणे : पुण्यात एक धक्कादायक तथा संतापजनक बातमी समोर आली आहे. पीडित तरुणीने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तरुणाने संतापजनक प्रकार केला आहे. तरुणीशी शरीरसंबंध ठेवत असल्याच्या वेळी तिच्या नकळत काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ तरुणाने इंटरनेटवरील पॉर्न साईटवर अपलोड केले. हे व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका २४ वर्षांच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनय शिरीष कुलकर्णी (वय २७, रा. फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३० डिसेंबर २०२३ ते १२ मे २०१५ या दरम्यान घडला आहे.

या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करीत आहे. विनय कुलकर्णी हा अ‍ॅटोमोबाईल इंजिनिअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून दोघांच्या सहमतीने त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. त्यावेळी तिच्या नकळत विनय कुलकर्णी याने तिचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढले होते.

काही कारणाने त्यांच्यात ब्रेकअप झालं. या तरुणीने विनय कुलकर्णी याला लग्नास नकार दिला. त्यानंतर गेल्या एक वर्षापासून त्यांचा संपर्क नाही. या तरुणीच्या एका मैत्रिणीला पॉर्न साईटवर तिचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ दिसला. या मैत्रिणीने तिला याची माहिती दिली. त्यानंतर या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT