गाडीचा धक्का लागल्याने लगावली कानशिलात; १७ वर्षीय मुलाने दगड मारून केला खून ओंकार कदम
मुंबई/पुणे

गाडीचा धक्का लागल्याने लगावली कानशिलात; १७ वर्षीय मुलाने दगड मारून केला खून

अल्पवयीन मुले चालवित असलेल्या दुचाकीचा तरुणाला धक्का लागला.

गोपाळ मोटघरे

पुणे : अल्पवयीन मुले चालवित असलेल्या दुचाकीचा तरुणाला धक्का लागला. यामुळे तरुणाने अल्पवयीन मुलाच्या कानशिलात लगावली होती. या रागातून अल्पवयीन मुलाने दगड मारून जखमी करून तरुणाला मारहाण (Beating) केली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. जाधववाडी चिखली येथे ३१ डिसेंबर दिवशी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

अल्पवयीन मुले चालवित असलेल्या दुचाकीमुळे या गुन्ह्याचा छडा लागला आहे. सुनील शिवाजी सगर (वय- ३५, रा. जाधववाडी, चिखली), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याविषयी त्यांच्या २५ वर्षीय पत्नीने शनिवारी चिखली (Chikhali) पोलीस (Police) ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार एका १७ वर्षीय आणि एका १४ वर्षीय अशा २ अल्पवयीन मुलांच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुनील सगर हे कामावरून घरी येत असताना. ते जाधववाडी, चिखली येथे आले असता आरोपींनी अज्ञात कारणाकरिता त्यांना मारहाण केली आहे.

हे देखील पहा-

यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा चिखली (Chikhali) पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे. अल्पवयीन मुलांनी गुन्हा करताना वापरलेल्या दुचाकी विषयी माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी गाडीमालकाकडे चौकशी केली आहे. ३१ डिसेंबर दिवशी सायंकाळी दुचाकी कोण चालवित होता, याविषयी पोलिसांनी गाडीमालकाकडे विचारणा केली.

गाडीमालकाच्या मुलाच्या दोन मित्रांनी गाडीची मागणी केली होती. मित्राला भेटायला चिखली येथे जायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे गाडीमालकाच्या मुलाने त्याच्या मित्रांना दुचाकी दिली होती. त्यानुसार पोलीस गाडीमालकाच्या मुलाच्या मित्रांच्या घरी गेले. ते दोघेही घरी मिळून आले होते. दोन्ही अल्पवयीन मुले दुचाकी घेऊन मित्राकडे जात होते. त्यावेळी जाधववाडी, चिखली येथे सुनील सगर यांना दुचाकीचा धक्का लागला होता.

त्यामुळे सगर यांनी दुचाकीवरील अल्पवयीन मुलांपैकी एकाच्या कानशिलात लगावली होती. याचा राग आल्याने अल्पवयीन मुलांनी सुनील यांना मारहाण केली. त्यामुळे सुनील हे त्यांच्या तावडीतून सुटून पळत- पळत एका किराणा दुकानात घुसले होते. अल्पवयीन मुलांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुनील यांना दुकानाबाहेर ओढून काढले. दोन्ही अल्पवयीन मुलांनी सुनील यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करायला सुरवात केली.

दुकानाबाहेर सुनील यांना मारहाण करताना १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने तेथे पडलेला दगड उचलला. तो दगड २ ते ३ वेळा डोक्यात मारल्याने सुनील हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे सुनील हे खाली पडले. यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यावेळी तेथे लोकांची गर्दी झाल्याने अल्पवयीन मुले घाबरून गाडी घेऊन तेथून निघून गेले. त्यानंतर त्यांनी मित्राला दुचाकी परत केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadgola Benefits: कडाक्याच्या उन्हात ताडगोळे खाल्याने कोणकोणते फायदे होतात, ही माहिती एकदा वाचाच

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT