Mental patients allegedly made to perform cleaning duties inside Yerwada Regional Mental Hospital, raising serious human rights concerns. 
मुंबई/पुणे

Yerwada Mental Hospital: येरवडा मनोरुग्णालय की छळछावणी? मनोरुग्णांना जुंपलं सफाईला

Yerwada Mental Hospital Scandal : येरवडा मनोरुग्णालयात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. ज्या मनोरुग्णांना आजारातून बरं होण्यासाठी रुग्णालयात पाठवलं जात त्याचं मनोरुग्णांना सफाई कामाला जुंपल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात घडलाय. त्यामुळे मनोरुग्णालय छळछावणी झालय का? पाहूय़ात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • येरवडा मनोरुग्णालयात रुग्णांकडून सफाई काम करून घेतल्याचा आरोप

  • उपचाराऐवजी जबरदस्ती कामामुळे मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा

  • रुग्णांच्या सुरक्षितता आणि काळजीवर गंभीर प्रश्न

ही दृश्य आहेत. पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील. जिथं महाराष्ट्रभरातून मनोरुग्ण मानसिक आजारातून सावरण्यासाठी येतात. ते मनोरुग्णालय आता झालंय छळछावणी. ही दृश्य पाहीलीत की तुमची खात्री पटेल कारण जे मनोरूग्ण इथे आजारावर उपचार घेण्यासाठी आलेत त्यांनाच साफसफाईला जुंपलय.त्यांच्याकडून स्वच्छतागृह साफ करून घेतली जातायत, कुठे मैला उपसणं तर कुठे कपडे धुतलेल्या गाड्या ओढण्याचं काम मनोरुग्णांकडून करून घेतलं जातयं.

खरंतर येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात राज्यभरातील मनोरुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल होतात. या रुग्णालयातील 15 वार्डात सध्या 920 मनोरुग्ण उपचार घेत आहेत. आम्ही जेव्हा येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात पोहचलो तेव्हा या मनोरुग्णांची नेमकी काय परिस्थिती समोर आली. तुम्हीच पाहा.

येरवडा मनोरुग्णालयात मनोरुग्णांकडून टॉयलेट, मैला स्वच्छतेचं काम करून घेतली जात होती. ढकलगाडीतून कपडे, जेवण वाहून नेण्याचं कामही मनोरुग्ण करत होते.ही काम करण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मनोरुग्णांचा छळ होत असल्याचाही आरोप आहे. तसचं वॉर्डच्या आजूबाजूला घाण, दुर्गंधी, दारूच्या बाटल्यांचा खच असल्याचंही पाहयला मिळालं. मनोरुग्ण अस्वच्छ तर होतेच पण त्यांच्या अंगावरील कपडेही स्वच्छ नव्हते. मनोरुग्ण कक्षातील बेड, फरश्या, बाथरूमची अवस्था दयनीय होती. मनोरुग्णालयात नवीन रुग्णांना वेळेवर दाखल करून घेतलं जात नसल्याच्याही तक्रारी आहेत.

दुसरीकडे याप्रकरणी सखोल माहिती मिळवण्यासाठी साम टीव्हीनं मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांना गाठलं. त्यावेळी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनीच हा प्रकार केल्याचं स्पष्टीकरण अधीक्षकांनी दिलयं. हा प्रकार समोर आल्यानंतर जागं झालेल्या प्रशासनानं मनोरुग्णांना कामाला लावणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आलेत. तसचं ठेकेदारालाही काळ्या यादीत टाकण्याची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आलीय. मात्र मनोरुग्णाची अशी परवड होत असताना प्रशासकीय यंत्रणा कुठे झोपली होती. घटनेची माहिती माध्यमांसमोर आल्यानंतर कारवाईचा बडगा उगारून हात झटकण्याचा प्रयत्न करणारी यंत्रणा स्वत: मनोरुग्ण झालीय का? याचा विचार होणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hot And Bold Photos: लाल रंगाच्या बिकनीमध्ये धुमाकूळ घालणारी 34 वर्षाची अभिनेत्री कोण? Photo पाहून ओळखलं का?

Maharashtra News Live Update : नवी मुंबईत पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले

Who is Bacchu Kadu: शेतकरी नेते, शिवसेनेतून सुरुवात, ४ वेळा आमदार; बच्चू कडू आहेत तरी कोण?

मोठी बातमी! बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश, पण ठेवली 'ही' अट

अमोल मिटकरींचा पत्ता कट, सुनेत्रा पवारांनी दिली या नेत्याला आमदारकी, नेमकं गणित काय?

SCROLL FOR NEXT