अविनाश भोसलेंची आणखी चार कोटींची मालमत्ता जप्त - Saam Tv
मुंबई/पुणे

अविनाश भोसलेंची आणखी चार कोटींची मालमत्ता जप्त (पहा व्हिडिओ)

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची आणखी चार कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचनालयाने जप्त केली आहे. मी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले Avinash Bhosale यांची आणखी चार कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचनालयाने (ईडी) ED जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग Money Laundering प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

याआधी ईडीने ED अविनाश भोसलेंना समन्स बजावले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती. आता ईडीने त्यांची चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने या आधी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह कुटुंबाची जवळपास ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. परदेश चलन नियंत्रण कायदा १९९९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

आता ईडीने त्यांची ४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. शिवाजीनगर येथील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या ऑफिसची मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांच्यासह कुटुंबियांनी FEMA चे उल्लंघन करून ठेवलेल्या फॉरेन सिक्युरिटीज जप्त करण्यात आल्या होत्या. यात भारताबाहेर असलेल्या फॉरेन सिक्युरिटीज किंवा स्थावर मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे भोसले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT