Worli Hit And Run Case Saam Digital
मुंबई/पुणे

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट; मिहिर शहाने मद्यपान केलेल्या त्या बारला ठोकले टाळे, दारूचं बील १८००० रुपये

Worli Hit And Run Case Update : वरळीच्या हिट अँड रन प्रकरणात मिहिर शहा आणि त्याच्या चार मित्रांनी ज्या तापस बारमध्ये बसून मद्यपान केलं होतं. त्या बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाळे ठोकले आहेत.

Sandeep Gawade

वरळीच्या हिट अँड रन प्रकरणात जुहूच्या ग्लोबल तापस बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दिवसांच्या तपासानंतर या बारला सील ठोकण्यात आलं आहे. आरोपी मिहिर शहा आणि त्याच्या चार मित्रांनी याच बारमध्ये अपघाताच्या रात्री तब्बल 18 हजाराची दारू पिलेली होती. रात्री उशिरापर्यंत मिहीर शहा आपल्या मित्रांसोबत जुहूच्या तापस बारमध्ये दारू पीत होता. दोन दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बार मधील स्टॉक मोजण्याचे काम सुरू होते.

दरम्यान वरळी अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला अटक करण्यात आली आहे. मिहिर शहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीला मदत करणाऱ्या तब्बल १२ लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. गाडीवरील महिलेला काही किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. रविवारी पहाटे भरधाव बीएमडब्ल्यू कारने दांपत्याला उडवल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरोपी मिहिर शहा फरार झाला होता. पोलिसांनी आरोपी मिहिर शहाच्या नावाने लूक आऊट जारी केली होती. अखेर आज तो पोलिसांच्या हाती लागला.

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. या सीसीटीव्हीत कार महिलेला फरफटत नेत असल्याचं समोर आलं होतं. मृत महिलेच्या पती यात जखमी झाले होते. त्यांनी मिहिर शहा कार चालवत असल्याचा आरोप केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT