Womens Safty: 'वाढत्या महिला अत्याचाराविरोधात विशेष अधिवेशन बोलवा'  
मुंबई/पुणे

Womens Safty: 'वाढत्या महिला अत्याचाराविरोधात विशेष अधिवेशन बोलवा'

एट्रॉसिटी कायद्या प्रमाणे महिला एट्रॉसिटी कायदा करावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली राज्यपालांकडे केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रामनाथ दवणे

राज्यातील महिलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या (Sexual harassment) पार्श्वभुमीवर आज भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि भाजप महिला आमदार यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. याभेटी दरम्यान त्यांनी राज्यसरकारने विशेष अधिवेशन (Special session) बोलवून या अत्याचारांच्या विरोधात योग्य निर्णय ध्यावेत, अशी मागणी यावेळी राज्यपालांकडे केली. तसेच, एट्रॉसिटी कायद्याप्रमाणे महिला एट्रॉसिटी कायदा करावा, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

सामना मधील लिहण्यात आलेल्या साकिनाका घटनेबाबतच्या अग्रलेखावर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांची तालिबानी वृत्ती रश्मी ठाकरे ठेचून काढणार का, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. साकिनाका घटनेत एक आरोपी पकडला आहे, असे संजय राऊत लिहतात अजून तपास सुरू असताना एक आरोपी पकडला आहे हे राऊत कसे सांगू शकतात. संजय राऊत मुंबईचे सिपी झाले आहेत का? असा प्रश्न ही वाघ यांनी उपस्थित केला आहे.

तर, महाविकास आघाडी सरकारला अजून महिला आयोगाची स्थापना करता आली नाही. महिला बालकल्याण मंत्री फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठवली असल्याचे सांगत आहेत. महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्र्यांना किंमत नाही तर सामन्यांना काय न्याय मिळणार, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

तसेच, महिला आयोग स्थापन झाले नसले तरी काम सुरू आहे, असे सगणाऱ्यांच्या डोळ्याखाली घटना घडत आहेत मग याचे उत्तर मंत्री देतील का? महिला आयोग हे महिलांच्या न्यायासाठी एक व्यासपीठ आहे ते बंद करायचे असेल तर सरकारने तसं सांगावे, असही चित्रा वाघांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT