Women's Day Story Special Story  
मुंबई/पुणे

Women's Day Story: नाका कामगाराची मुलगी ते राष्ट्रीय खेळाडू, रेश्मा राठोडचा संघर्षमय प्रवास

Women's Day Story Special Story: बदलापूरची खो-खो संघाची खेळाडू रेश्मा राठोडचा संघर्षमय प्रवास आपण जाणून घेऊया.

मयुरेश कडव

आई-वडील नाका कामगार, दहा बाय दहाचं पत्र्याचं घर, भाऊ रिक्षा चालक. पण तिने जिद्द सोडली नाही. रोजच्या जगण्यातल्या संघर्षावर मात करत तिने भारतीय संघात स्थान मिळवलं आणि विश्वचषकावर देशाचं नाव कोरलं. ही कहाणी आहे बदलापूरची खो-खोपटू रेश्मा राठोडची.

ही आहे रेश्मा राठोड. खो खो विश्वचषक विजेत्या भारतीय महिला संघाची खेळाडू. दिल्लीत नुकताच महिला खो-खो विश्वचषक पार पडला. यात भारतीय महिला संघानं नेपाळचा पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. विश्वचषक विजयानंतर बदलापूरची रेश्मा युवा आयकॉन म्हणून चर्चेत आलीय. मात्र विश्वचषक विजेत्या संघातील रेश्माचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. रेश्माचे आई-वडील नाका कामगार आहेत. एक भाऊ रिक्षा चालक तर एक भाऊ हॉटेलात काम करतो.

बदलापुरातल्या शांतीनगरातील बंजारा वस्तीत पत्र्याचं घर, तेही दहा बाय दहाचं.भटक्या विमुक्त समाजातील असल्यानं रेश्माचं शिक्षण तिचा खेळ अनेकांच्या डोळ्यात खूपच होता. मात्र कुटुंबाला तिला भक्कम साथ दिली. शिवाय तिच्या शिवभक्त शाळेचे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. अत्यंत खडतर परिस्थितीत बर मात करत रेश्मानं खो-खोमध्ये नाव पटकावलं आणि बघता बघता तिचा भारतीय महिला संघात समावेश झाला.

विश्व विजेत्या संघातील खेळाडू असल्याने तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. रेश्माच्या कामगिरीने बदलापूरकरांची मान अभिमानानं उंचावल्याचं तिचे शिक्षक सांगतात. याहीपुढे तिने अशाच प्रकारे चांगली कामगिरी करत देशाचं नाव पुढे न्यावं आणि देशाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

परिस्थिती कशीही असो, जिद्द आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाह, हे रेश्मानं दाखवून दिलय. कुटुंबीयांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावत तिने अभिमानास्पद कामगिरी केलीय. तिचा आणि तिच्या कुटुंबीयांचा आदर्श इतरांनीही घेतल्यास रेश्मासारखे अनेक गुणी खेळाडू तयार व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT