Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Baramati Crime: अंगणात कोंबड्या आल्याच्या रागातून महिलेची कुऱ्हाडीने हत्या; पहा व्हिडिओ

या हल्ल्यात गंगुबाई गंभीर जखमी झाल्या. गंगुबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - कोंबड्या अंगणात आल्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात कुऱ्हाडीने वर करत एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील कऱ्हावागज येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटने प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक (police Arrested) करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव गंगूबाई तात्याराम मोरे असे आहे. मृत महिला आणि आरोपाचे घर समोरा-समोर आहे. (Latest Baramati Crime News)

गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही कुटुंबामध्ये अंगणात कोंबड्या येण्यावरुन आणि ५ फूटांच्या जागेवरुन वारंवार वाद होत होते. रविवारी (९ जानेवारी ) दुपारी देखील याच कारणावरून आरोपीच्या बायको बोरबर गंगुबाई यांचा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आरोपी किरणने गंगूबाई यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात गंगुबाई गंभीर जखमी झाल्या. गंगुबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळ घोषणेवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया; चंद्रपूरमधील सुटलेल्या तालुक्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Dal Makhani Recipe: हॉटेलमध्ये खाण्याची गरज नाही! अशी बनवा घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी दाल माखनी

Cheese Ball Recipe: लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत आणि चीजने भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

Shocking : विद्यार्थ्याने गणिताचा प्रश्न सोडवला नाही, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं; संभाजीनगरमधील घटना

Skin Care: ऑयली, ड्राय की कॉम्बिनेशन स्किन? तुमच्या त्वचेसाठी कोणता फेसवॉश आहे बेस्ट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT