Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: अर्थसंकल्प की जुमला संकल्प, महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे बरसले

Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2024: आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. यावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प की जुमला संकल्प, असं म्हणत ते महायुती सरकारवर बरसले आहेत.

Satish Kengar

सुरज मसुरकर, साम टीव्ही, मुंबई प्रतिनिधी

''दोन वर्षात ज्या योजना जाहीर केल्या, त्या प्रत्यक्षात अमलात किती आल्या हे, एक तज्ज्ञांची समिती नेमून निवडणुकीपूर्वी एक श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत, ज्या घोषित झाल्या मात्र प्रत्येक्षात आल्या नाहीत. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ठ म्हणजे, महिलांची मते आपल्या बाजूने करून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केल्याचं दिसत आहेत. हा अर्थसंकल्प की जुमला संकल्प'', असं म्हणत उद्धव ठाकरे महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर बरसले आहेत.

आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. ज्यात त्यांनी महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. याच पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''एकूणच लोकसभा निवडणुकात गेले दहा वर्ष आश्वासन आणि थापांना कंटाळून जनतेने धडा शिकवला. पण जनता आता यांच्या थापांवर विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र आहे. यांचा प्रयत्न हाच आहे की, धुळफेक करायची. जनतेला फसवायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्राला ओरबडायचं.''

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य करत ते म्हणाले, ''माझं ऐकून वीजबिल माफ केली, पण कर्जमाफ करा हे मान्य केलं नाही. शेतकऱ्याला एका बाजूने लुटायचं आणि दुसरीकडे मदतीचा आव आणायचा, हे सोंग आहे. शेतकरी आणि जनता निवडणुकीची वाट बघत आहेत.''

'हा अर्थसंल्प म्हणजे घोषणांचा पाऊस'

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली. ते म्हणाले की, ''जो अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणांचा पाऊस आहे. शेतकरी आभाळाकडे बघतोय. दुबार पेरणी करावी लागली. पण फेकू सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. ''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT