Pune Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime : प्रेमविवाहानंतर चारित्र्यावर संशय; पतीनं ब्लॉक केल्यानं पत्नीनं संपवलं जीवन

पतीने संशय घेत मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवयात्रा संपवली आहे.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने संशय घेत मोबाईल नंबर ब्लॉक केल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवयात्रा संपवली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) कात्रज परिसरात ही घटना घडली आहे. समीक्षा (वय २२ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी अविनाश (रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, अविनाश आणि समीक्षा हे दोघे मूळचे यवतमाळ (Yavatmal) येथील आहेत. त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी घरी न सांगता प्रेमविवाह केला. समीक्षा ही शिक्षणासाठी पुण्यात राहत होती.

लग्नानंतर काही दिवसांनीच पती अविनाश हा पत्नी समीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. समीक्षा दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय घेऊन तो तिला मारहाण करीत होता. यामुळे समीक्षा कायम दु:खी असायची.

दरम्यान, अविनाशने पत्नी समीक्षाला मानसिक त्रास देऊन तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. त्यामुळे यामुळे समीक्षाला प्रचंड मनस्ताप झाला आणि तिने राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील खासदारांना ५० कोटींना विकत घेतलं जात आहे, महत्त्वाच्या व्यक्तीने दिली माहिती - संजय राऊत

६ खासदार शिंदेंसेनेत जाणार? समजताच उद्धव ठाकरेंनी उचलले मोठं पाऊल, दिल्लीत टाकला डाव, थेट 'हा' कायदा वापरणार

Pune : पुण्यात धक्कादायक घटना! शेतातलं काम सांगितलं म्हणून नातू संतापला; रागारागात आजोबाची केली हत्या

Lionel Messi: वर्ल्डकपमध्ये पहिला गोल करताच मेस्सीला अश्रू अनावर, सामन्यानंतर स्वतःच सांगितलं कारण

Bollywood Singer Video : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक गंभीर आजाराशी देतोय झुंज; MRI-CT स्कॅनही केलं, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT