Mumbai news  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : भाजी आणायला बाहेर पडल्या, मृत्यूने रस्त्यातच गाठलं; इमारतीवरुन प्लास्टिक ट्रे डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

Mumbai Accident News : इरेन रॉड्रिग्स असे मृत महिलेचे नाव असून , ती माहीम पश्चिम येथील कापड बाजार येथे राहत होती.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : मृत्यू कुणाला कुठे गाठेल याचं काही सांगू शकत नाही. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. एका इमारतीच्या बांधकाम साईटवरुन जात असताना डोक्यात प्लास्टिकच ट्रे कोसळून ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

इरेन रॉड्रिग्स असे मृत महिलेचे नाव असून , त्या माहीम पश्चिम येथील कापड बाजार येथे राहत होती. त्या सिटी लाइट सिनेमाजवळील बाजारात मासे आणि भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या.   (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी २.१५ च्या सुमारास श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या नवीन उंच इमारतीचे बांधकाम सुरू असताना आठव्या मजल्यावरुन प्लॅस्टिकचा ट्रे खाली पडला. त्यावेळी रस्त्यावरुन जात असलेल्या इरेन यांच्या डोक्यात तो प्लास्टिक ट्रे पडला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. (Crime News)

त्यावेळी, एका व्यक्तीने त्यांच्या बहिणीला फोन करुन अपघाताची माहिती दिली. इरेन यांना तातडीने सायन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT