अंबरनाथमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह  Saam Tv
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

महिलेची हत्या झाल्याचा संशय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambarnath) महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या (Shivajinagar Police Thane) हद्दीतील गायकवाड पाडा (Gaikwad Pada) परिसरात एका बंद घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, भागुबाई चाळीत काही दिवसांपूर्वी मृत महिला आणि एक व्यक्ती भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होते. मात्र हे घर बंद होते शिवाय त्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान घरमालकाने नागरिकांच्या मदतीने टाळा तोडून खोलून पाहिले असता, या महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याने तात्काळ याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत मृतदेह ताब्यात घेतला आहे. या महिलेचा पती हा या घटनेनंतर फरार झाला असून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीसांनी एक पथक तयार केले आहे. पोलीसांना ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT