बापरे बाप! महिलेने केसांमध्ये गुंडाळला साप VIDEO बघून व्हाल हैराण  Saam Tv
मुंबई/पुणे

बापरे बाप! महिलेने केसांमध्ये गुंडाळला साप VIDEO बघून व्हाल हैराण

सध्या फॅशनच्या नावाखाली काहीपण चालतं आहे, हे आपल्याला चांगलच माहिती आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या फॅशनच्या नावाखाली काहीपण चालतं आहे, हे आपल्याला चांगलच माहिती आहे. जगात असे काही लोक (People) आहेत. जे काहीपण विचित्र फॅशन (Fashion) करत असतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जिने तर फॅशनच्या बाबतीमध्ये हद्दच पार केली आहे. फॅशन म्हणून तिने आपल्या केसांना चक्क जिवंत सापच गुंडाळला आहे.

पहा व्हिडिओ-

केसांसाठी बऱ्याच एक्ससेरीज असतात. रबर, हेअरबँड, रिबन, क्लिप याशिवाय बरेच काही असत. पण या महिलेने आपल्या केसांकरिता अशी कोणतीच हेअर एक्सेसरीज वापरली नाही तर तिने चक्क एका जिवंत सापाचा वापर केला आहे. केसांना रबर लावण्याऐवजी तिने जिवंत साप (Snake) गुंडाळला आहे.

व्हिडीओमध्ये (video) तुम्ही बघू शकता एक महिला चालताना दिसत आहे. तिने केसांचा मोठा बन बांधला आहे. पण या बनला तिने कोणता रबर किंवा क्लिप न लावता एक साप गुंडाळाला आहे. केसांमध्ये साप घेऊन ही महिला एका मॉलमध्ये देखील गेली आहे.

महिलेच्या डोक्यात काहीतरी विचित्र दिसल्यामुळे लोकांच्या नजर तिच्याकडे गेली आणि त्यांना जेव्हा तिच्या केसात साप आहे, हे समजलं तेव्हा सर्वांना घामच फुटला होता. काही लोकांनी तर आपला मोबाईल काढून याचा व्हिडीओ देखील बनवला आहे. महिलेचे फॅशन म्हणून हे विचित्र एक्सपेरिमेंट बघून सर्वांना धक्का बसणे साहजिक आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

SCROLL FOR NEXT