Badlapur Saam tv News
मुंबई/पुणे

Badlapur: बदलापूर स्थानकात भयंकर अपघात! धावत्या लोकलमधून महिला पडली; डोक्याला गंभीर इजा

Badlapur Train Accident: बदलापूर स्थानकात भयंकर अपघाताची घटना घडली आहे. एक महिला चालत्या लोकलमधून खाली पडली आहे. तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

Bhagyashree Kamble

अजय दुधाणे, साम टीव्ही

बदलापूर स्टेशनजवळ लोकलमधून पडून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कर्जतहून सीसीएसएमटीला जाणारी लोकल बदलापूर स्थानकात आली होती.

दरम्यान प्रचंड गर्दी असल्यामुळे धावत्या लोकलमधून ती खाली पडली. महिलेच्या डोक्याला जबर मार लागला असून, रेल्वे पोलिसांनी महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

बदलापूर स्थानकाजवळ एक भयंकर अपघाताची घटना घडली आहे. एक महिला धावत्या ट्रेनमधून खाली पडली आहे. कर्जतहून सीसीएसएमटीकडे जाणारी लोकल बदलापूरला आली होती. ही लोकल ८ वाजून ५९ मिनिटांनी बदलापूर स्थानकावर पोहोचली. कर्जतहून आल्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती.

यात ती महिला चढली, गर्दी अल्यामुळे ती दाराजवळच उभी होती. मात्र, लोकल सुटल्यानंतर महिला धावत्या लोकलमधून खाली पडली आहे. कल्पना जेडिया असं महिलेचं नाव आहे. या महिलेच्या डोक्यात जबर मार लागला असून, रेल्वे पोलिसांनी तातडीनं त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल अर्धा तास एकही लोकल उपलब्ध नव्हती. त्यामुळेच ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. मात्र ,ही लोकल कर्जतवरून सुटल्यामुळे आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. त्यामुळे बदलापूरकरांना दारात लटकून प्रवास करावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

SCROLL FOR NEXT