धक्कादायक : DYSP ने विनयभंग करुन चुकीचा गुन्हा नोंदवला; महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न SaamTV
मुंबई/पुणे

धक्कादायक : DYSP ने विनयभंग करुन चुकीचा गुन्हा नोंदवला; महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

DYSP च्या विरोधात अनेकदा तक्रारी करून कोणी जुमानत नसल्याने मंत्रालायसमोर आत्महत्येचा प्रयत्न

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईत आज सकाळी मंत्रालयासमोर (Front of The Ministry) एक धक्कादायक प्रकार घडला एका महिला वकिलाने (Women lawyers) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दौंडच्या DYSP डीवायएसपीने आपला विनयभंग करून चुकिचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप संबंधीत महिलेने केला आहे. (Woman attempts suicide outside ministry)

हे देखील पहा -

मात्र आपल्यावरती झालेल्या अत्याचाराची कोणीच दखल घेत नाही. अनेकदा तक्रारी करून पण कोणी जुमानत नसल्याने सदर महिलेने मंत्रालायसमोरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान या महिला वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. महिला पोलिसांनी तिला अडवलं आणि मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनला आता पुढील तपासासाठी घेऊन गेले आहेत. मात्र ही महिला कोण आहे आणि त्यांची नेमकी काय मागणी आहे हे कळालं नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : मुलुंडमध्ये कारच्या इंजिनमध्ये आढळला 5-6 फूट लांबीचा साप

LPG Cylinder Booking: ऑनलाइन-ऑफलाइननेही सिलिंडर बुक होत नाही? नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT