Winter Assembly Session  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : अखेर हिवाळी अधिवेशनाची फायनल तारीख ठरली; किती दिवस चालणार अधिवेशन? वाचा...

हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून ३० डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Winter Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या १९ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होणार असून ३० डिसेंबरपर्यंत म्हणजेच दोन आठवडे चालणार आहे. (Latest Marathi News)

नागपूर करारानुसार शहरात किमान ३० दिवस विधिमंडळाचे अधिवेशन चालायला हवे. परंतु तसे होत नाही. साधारणपणे नागपुरातील (Nagpur) हिवाळी अधिवेशन हे डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सुरु होते. परंतु यावेळी थोड्या उशिरा म्हणजे १९ डिसेंबरपासून अधिवेशन सुरु होणार आहे.

दरम्यान, कामकाजाचा पहिला आठवडा हा अनेक वादग्रस्त प्रकरणं आणि राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर चर्चांवर जाईल. त्यामुळे पहिला आठवडा हा कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणारा असेल. तर, दुसऱ्या आठवड्यात अधिकाधिक शासकीय कामकाज असेल. त्यामुळे पहिला आठवडा सभागृहात आणि बाहेर देखील लक्षवेधी असेल.

राज्यपालांचा मुद्दा गाजणार?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या वक्तव्याने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आंदोलने आणि त्यांना परत पाठविण्याची मागणी झाल्यावरही अद्याप केंद्राकडून त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनात केंद्रस्थानी असेल. शिवाय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन देखील विरोधक सत्तापक्षाला घेरण्याची शक्यता आहे.

याशिवाय  राज्यातील अनेक जिल्हयात झालेली अतिवृष्टी, मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान यावरून सुद्धा विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची सातत्याने मागणी केली. मात्र, सरकारकडून म्हणावी अशी मदत मिळालेली नाही. यावरुन विरोधक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. 

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा|VIDEO

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उद्या मतदान

Maharashtra Politics : नांदेडमध्ये महायुतीत धुसफूस! निवडणूक स्वबळावर लढण्याचा शिवसेनेच्या आमदाराचा भाजपाला कडक इशारा

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

Hairstyle Ideas: स्वानंदीच्या या ९ हेअरस्टाईल तुम्ही करा ट्राय; प्रत्येक लूकवर दिसतील एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT