Pune : बाबासाहेबांच्या शिवसृष्टीची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार - एकनाथ शिंदे SaamTV
मुंबई/पुणे

बाबासाहेबांच्या शिवसृष्टीची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार - एकनाथ शिंदे

शिवसेनेला (Shivsena) कोणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे वक्तव्य देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या घरी सांत्वपर भेट देण्यासाठी आज पुण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले 'पुरंदरेंच्या निधनाने न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. शिवचरित्र त्यांनी घराघरात पोहोचवलं जाणता राजा च्या माध्यमातून देश विदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पोहचल्याचे ते म्हणाले.

हे देखील पहा -

दरम्यान, आपण काल पहाटे परभणीला (Parbhani) गेल्याने अंत्यदर्शनासाठी येऊ शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाबासाहेबांच्या शिवसृष्टीची संकल्पना (The concept of Shivsrishti) पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

भाजपकडून BJP भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत यावरती देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, 'हे आरोप नवीन नाही, जेव्हापासून सरकार स्थापन झालं, तेव्हापासून हे आरोप होत आहेत. कोविडचे संकट (Covid-19) नैसर्गिक संकट येत आहेत मात्र कुठेही पॅकेज कमी पडू दिले नाही. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार चांगले काम करत असून त्याचा गौरव थेट सर्वोच्च न्यायालयाने आणि खुद्द पंतप्रधानानी (PM) केला असल्याच ते म्हणाले तसेचशिवाय विरोधकांकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सेनेवरती टीका करणाऱ्यांना त्यांना शिवसेनेला (Shivsena) कोणी हिंदुत्व (Hindutva) शिकवण्याची गरज नसल्याचा सल्ला देखील त्यांनी विराधी पक्षाला दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT