Sharad Pawar and Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी मदत करणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार - पवार

Jagdish Patil

सचिन जाधव -

पुणे: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस मदत करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना हा वेगळा पक्ष असून राष्ट्रवादी (NCP) त्यात काही संबंध नसल्याचं पवारांनी सांगितलं.

पवार (Sharad Pawar) म्हणाले, राज्यांत दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava) जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झालेत पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी.

पाहा व्हिडीओ -

आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळींना सांगाव, आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पहावं असं आवाहन शरद पवार यांनी राज्यातील नेत्यांना केलं आहे. तसंच २०१४ ला शिवसेनेसोबत (Shivsena) सरकार स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव आला असतां तर मला समजलं असतं, अशोक चव्हाण काही बोलल्याचं मला तरी माहिती नाही असं म्हणत पवारांनी सरकार स्थापनेचा दावा फेटाळला.

मेळावा सेनेचा राष्ट्रवादीचा संबंध नाही -

शिवाय यंदाच्या उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी मदत करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, या बाबत पवारांना प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे. तो वेगळा पक्ष आहे, त्यामुळे राष्ट्रवादी त्यात काही करणार नाही असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.

तर अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण (Maratha Reservation) द्याव अशी मागणी आहे त्यांवर राष्ट्रवादीची भूमिका काय ? असा प्रश्न विचारला असता, आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही ,निर्णय राज्य सरकार ने घ्यावा असं पवारांनी उत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT